पालघर, [13.10.2025] – पालघर पोलीस दलाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या जबाबदारीबरोबरच सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीही पार पाडत, वाढवण बंदोबस्तादरम्यान वरोर समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवले.
या उपक्रमात पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समुद्रकिनाऱ्यावर पसरलेल्या प्लास्टिक बाटल्या, पॅकेट्स, इलेक्ट्रॉनिक कचरा आणि इतर घाण गोळा करून परिसराला नवीन चमक दिली. हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता, स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीनेही राबविण्यात आला.
या मोहिमेला उपविभागीय पोलीस अधिकारी (बोईसर) विकास नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते (वाणगांव पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली 8 पोलीस अधिकारी आणि 180 पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
पालघर पोलिसांच्या या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीची भावना वाढली असून, अशा उपक्रमांचे कौतुक सर्वत्र होत आहे. पोलीस दलाने दाखवलेल्या या नवीन आयामामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन समाजाच्या हितासाठी काम करण्याचा संदेश दिला आहे.